करमाळा (सोलापूर) : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या निधीतून करमाळा तालुक्यासाठी 1.90 कोटी निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती भाजपाचे जिल्हा सरचिटणीस तथा सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य गणेश चिवटे यांनी दिली आहे.

चिवटे म्हणाले, माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी 25-15 व 12-38 या योजनेअंतर्गत करमाळा तालुक्यासाठी 1 कोटी 90 लाखा विकास कामे मंजूर झाली आहेत. यामध्ये आवाटी, कंदर, केम, चिखलठाण, जिंती, तरटगाव,
पोमलवाडी, भालेवाडी, वांगी-3, वांगी – 4, करंजे, झरे, बिटरगाव श्री, मोरवड, मिरगव्हाण या गावांमधील कामे मंजूर झाली आहेत.

मंजूर कामे पुढीलप्रमाणे आवाटी येडेश्वरी मंदिर सभामंडप १० लाख रु.,कंदर पवार घर ते विठ्ठल मंदिर मार्गे संजय थोरे घर रस्ता सुधारणा १० लाख रु.,केम हनुमान मंदिरसमोर सांभामंडप १० लाख रु, केम भैरवनाथ मंदिर सभामंडप १० लाख रु,चिखलठाण सुभाष सुराणा घर ते संजय उंबरे रस्ता काँक्रीटिकरण १० लाख रु.,चिखलठाण अर्जुन टिंगरे घर ते जि. प. शाळा रस्ता सिमेंटिकरण १०लाख रु.,जिंती जिंती ते पोमलवाडी रस्ता डांबारीकरण १० लाख रु.,जिंती गाव ते रेल्वे स्टेशन रस्ता काँक्रीटिकरण १० रु.,तरडगाव सभामंडप १० लाख रु.,पोमलवाडी वाचनालय सभागृह १० लाख रु.,भालेवाडी भालेवाडी ते जुने गावठाण रस्ता दुरुस्ती १० लाख रु.,वांगी नंबर ३ गणपतराव सातव दुकान ते गुरुलिंग पांडेकर घर रस्ता दुरुस्ती १० लाख रु.,वांगी नंबर ४ चांद तांबोळी घर ते विष्णू ढवळे घर रस्ता १० लाख रु,रांझनी ओंकारनाथ देवस्थान पेवर ब्लॉक १० लाख,करंजे व्यायाम शाळा बांधणे ५ लाख,झरे अमृळे वस्ती ते बागल वस्ती रस्ता ५लाख,झरे चौधरी वस्ती हातपंप ते चंद्रकांत चौध रस्ता काँक्रीटिकरण१० लाख,बिटरगाव श्री जुना करमाळा रस्ता सुधारणे १० लाख,मोरवड व्यायामशाळा बांधणे १० लाख,मिरगव्हाण स्मशानभूमी सुशोभीकरण १० लाख,मिरगव्हाण जुने गावठाण ते शिरसाठ महाराज रस्ता १० लाख रु. आदी लोकोपयोगी विकास कामे मंजूर केल्याबद्दल करमाळा तालुक्यातील सर्व स्तरातील जनतेमधून त्यांचे आभार मानले जात आहे, या पुढील नजिकच्या काळात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे आणखी विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देणार आहेत. करमाळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी ते नेहमी प्रयत्न करत असल्याचेही चिवटे यांनी सांगितले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *