फेर सरपंच आरक्षण सोडतीत करमाळा तालुक्यात ५५ गावांमध्ये बदल

Changes in 55 villages in Karmala taluka in Sarpanch reservation draw

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतीच्या फेर सरपंच आरक्षण सोडतीत ५५ गावांचे आरक्षण बदलले आहे. सर्वसाधारणमध्ये सर्वाधिक बदल झाला असून काही ठिकाणी गेल्यावेळी महिला आरक्षित सरपंच असताना आताही महिलाच आरक्षण पडले आहे. तर सर्वसाधारणमध्येही असेच झाले आहे. त्यामुळे आरक्षण सोडतेवेळी उपस्थितांनी प्रश्न केला मात्र निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रक्रिया राबवली जात असून महिलांचे ५० टक्के आरक्षण देताना अडचण येत असल्याचे स्पष्टीकरण तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी दिले.

करमाळा पंचायत समितीच्या सभागृहात आज (मंगळवारी) सरपंचपदासाठी फेर आरक्षण सोडत झाली. २०२५ ते २०२९ दरम्यान हे आरक्षण असणार आहे. २२ एप्रिलला झालेली आरक्षण सोडत रद्द झाली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आज फेर आरक्षण सोडत झाली. यावेळी तालुक्यातील विविध गावातील नागरिक उपस्थित होते. नायब तहसीलदार विजयकुमार लोकरे, विजयकुमार जाधव यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी तहसीलदार ठोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरक्षण सोडत प्रक्रिया पार पाडली.

‘या’ गावात झाले बदल (पूर्वी म्हणजे २२ एप्रिलला पडलेले आरक्षण)
पाथुर्डी येथे अनुसूचित जाती सर्वसाधारण आरक्षण पडले असून येथे पूर्वी अनुसूचित जाती महिला आरक्षण होते. उमरड येथे अनुसूचित जाती महिला आरक्षण पडले असून येथे पूर्वी अनुसूचित जाती सर्वसाधारण होते. केत्तूर येथे ओबीसी महिला राखीव आरक्षण असून येथे पूर्वी सर्वसाधारण आरक्षण होते. नेर्ले, कोंढेज, वडशिवने, जातेगाव व गुळसडी येथे ओबीसी महिला राखीव आरक्षण पडले असून येथे पूर्वी सर्वसाधारण महिला आरक्षण होते.

केडगाव, लव्हे, वरकुटे, कुंभारगाव, सातोली येथे ओबीसी सर्वसाधारण आरक्षण असून यातील लव्हेत सर्वसाधारण महिला तर इतर गावांमध्ये सर्वसाधारण आरक्षण होते. तरटगाव, मोरवड, पाडळी, पोथरे- निलज, शेटफळ, घोटी, मांगी, जिंती, अंजनडोह, खडकी, रोशेवाडी, हिवरे, सरपडोह, वांगी १, वांगी ४ व भिवरवाडी, केम, कावळवाडी, कात्रज, मांजरगाव, बोरगाव, हिवरवाडी व कुगाव येथे सर्वसाधारण महिला आरक्षण पडले आहे. यापूर्वी यातील काही गावात सर्वसाधारण तर काही गावात सर्वसाधारण महिला आरक्षण होते. काही गावात ओबीसींचे आरक्षण होते.

वीट, बाळेवाडी, हिंगणी, ढोकरी, राजुरी, रिटेवाडी, वडाचीवाडी- दिलमेश्वर, आवाटी, वारकाटने, सालसे, सावडी, लिंबेवाडी, कामोणे, हिसरे, जेऊर, कविटगाव, कंदर, उंदरगाव, निमगाव, आळसुंदे येथे सर्वसाधारण आरक्षण असून यातील काही गावात यापूर्वी ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला असे आरक्षण होते.

असे आहे मंगळवारी १५ जुलैला सोडत झालेले आरक्षण
सर्वसाधारण : १) वीट, २) बाळेवाडी, ३) हिंगणी, ४) ढोकरी, ५) राजुरी, ६) रिटेवाडी, ७) वडाचीवाडी/ दिलमेश्वर, ८) आवटी, ९) वरकाटणे, १०) खातगाव, ११) दिवेगव्हाण, १२) पारेवाडी, १३) टाकळी, १४) कोर्टी/ गोरेवाडी/ हुलगेवाडी/ कुस्करवाडी, १५) विहाळ, १६) कुंभेज, १७) भिलारवाडी, १८) वंजारवाडी, १९) पांडे/ खांबेवाडी/ धायखिंडी, २०) मिरगव्हाण, २१) अर्जुननगर, २२) बिटरगाव वा, २३) सालसे, २४) सावडी, २५) लिंबेवाडी, २६) कामोणे, २७) हिसरे, २८) जेऊर, २९) कविटगाव, ३०) कंदर, ३१) उंदरगाव, ३२) निमगाव ह, ३३) आळसुंदे.

सर्वसाधारण (महिला) : १) तरटगाव, २) मोरवाड, ३) पाडळी, ४) पोथरे/ निलज, ५) शेटफळ, ६) घोटी, ७) मांगी, ८) पांगरे, ९) जिंती, १०) अंजनडोह, ११) खडकी, १२) रोशेवाडी, १३) हिवरे, १४) सरपडोह, १५) वांगी १, १६) वांगी २, १७) वांगी ३, १८) भिवरवाडी/ वांगी ४, १९) केम, २०) कावळवाडी, २१) कात्रज, २२) मांजरगाव, २३) बोरगाव, २४) हिवरवाडी, २५) कुगाव, २६) सांगवी, २७) पोमलवाडी, २८) सोगाव, २९) पोंधवडी, ३०) वडगाव द/उ. ३१) भोसे, ३२) रामवाडी, ३३) देवीचामाळ.

अनुसूचित जाती सर्वसाधारण : १) पाथुर्डी, २) घारगाव, ३) सौन्दे, ४) दहिगाव, ५) शेलगाव वा, ६) मलवडी.

अनुसूचित जाती महिला : १) फिसरे, २) वाशिंबे, ३) देवळाली/ खडकेवाडी, ४) साडे, ५) उमरड, शेलगाव क.

नागरिकाचा मागास प्रवर्ग (ओबीसी) सर्वसाधारण : १) केडगाव, २) भाळवणी, ३) लव्हे, ४) वरकुटे, ५) कुंभारगाव/ घरतवाडी, ६) सातोली, ७) गुलमोरवाडी/ भगतवाडी, ८) गोयेगाव, ९) रावगाव, १०) चिखलठाण, ११) देलवडी, १२) पोटेगाव, १३) गौडरे, १४) जेऊरवाडी.

नागरिकाचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला : १) केत्तूर, २) नेर्ले, ३) कोंढेज, ४) वडशिवणे, ५) बिटरगाव श्री, ६) पिंपळवाडी, ७) करंजे/ भालेवाडी, ८) झरे, ९) निंभोरे, १०) जातेगाव, ११) कोंढारचिंचोली, १२) आळजापूर, १३) कोळगाव, १४) गुळसडी, १५) पोफळज.

अनुसूचित जमाती : पुनवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *