करमाळा : लोणावळा येथे अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने दिवेगव्हाणच्या सरपंच माधुरी खातमोडे यांना ‘ग्रामरत्न सरपंच’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील, माजी विभागीय उपायुक्त चंद्रकांत दळवी व प्रसिद्ध इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. हनुमंत खाटमोडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
सरपंच खाटमोडे यांनी दिवेगव्हाणमध्ये शेत रस्ते, अंडरग्राउंड गटार, फेव्हिन्ग ब्लॉक, जिल्हा परिषदच्या शाळेसाठी उपयुक्त साहित्य वाटप, रोजगार हमी योजनेमधून विविध प्रकारच्या योजना राबविल्या आहेत. स्वच्छता गृह, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावलेला आहे. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.