करमाळा (सोलापूर) : गुरुपौर्णेमेनिमित्त बिटरगाव श्री येथे सेवानिवृत्त शिक्षक हंबीरराव मुरूमकर यांचा काल (मंगळवारी) सत्कार करण्यात आला. करमाळ्यातील डॉ. शैलेश देवकर, बंडू उपाध्ये, राजेश रासकर, पत्रकार सूर्यकांत होनप यांनी हा सत्कार केला आहे. 1982 ते 1986 दरम्यान पहिली ते चौथीला मुरूमकर हे आम्हाला शिक्षक होते, असे होनप यांनी सांगितले आहे. त्यांचे विद्यार्थी डॉ. देवकर, उपाध्ये, रासकर यांनी गुरुजींचा सत्कार केला.
