करमाळा (अशोक मुरूमकर) : कायदा सुव्यवस्था आबाधित रहावा म्हणून काम करत राहणार असून कार्यक्षेत्रातील नागरिकांची गरज ओळखून काम केले जाईल, असे करमाळा उपविभागीय पोलिस अधिकारी अंजना कृष्णा यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितले आहे.
अजित पाटील यांची बदली झाल्यानंतर करमाळा उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून अंजना कृष्णा यांनी पदभार घेतला आहे. अंजना कृष्णा या केरळमधील आहेत. त्यांची २०२२- २३ ची बॅच आहे. त्यांनी पंढरपूरमध्ये प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर करमाळा येथे अधिकारी म्हणून तत्यांनी पहिल्यांदाच पदभार स्वीकारला आहे. अजित पाटील यांच्याकडे त्यांनी करमाळ्याचा पदभार स्वीकारला.
उपविभागीय पोलिस अधिकारी अंजना कृष्णा म्हणाल्या, ‘करमाळा उपविभागमध्ये कायदा सुव्यवस्था आबाधित ठेवण्यावर माझा भर राहणार आहे. सर्वसामान्य नागरिक व पोलिस यांचा योग्य समनव्य कसा राहील यासाठी काम केले जाईल. पोलिस अधीक्षक अतुलचंद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली येथे काम केले जाईल. कार्यकक्षेत्रातील पोलिस ठाण्यांची माहिती घेतली जात आहे. येथे नागरिकांना न्याय दिला जाईल,’ असे त्या म्हणाल्या आहेत.