करमाळा (सोलापूर) : कुणबी मराठा समाजाची कुणबी नोंद असलेली आडनाव गावनिहाय यादी प्रशासनाने जाहीर केली आहे. ती यादी मोडी लिपीत असल्याने नागरिकांना समजण्यासाठी अडचण येत आहे. त्यामुळे मोडी लिपीतून मराठी भाषांतर करून मराठीमध्ये यादी जाहीर करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश कुकडे यांनी केली आहे.
कुकडे म्हणाले, कुणबी मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्यात आले असून गावनिहाय यादीही पीडीएफ स्वरूपात देण्यात आली आहे. ती यादी मोडी लिपीमध्ये असल्याने नागरिकांना आपल्या कुणबीची नोंद समजत नाही. त्यामुळे मोडी लिपी वाचकांकडून शहानिशा करून सरकारी अधिकाऱ्यांनी प्रामाणित स्वरूपात गावनीहाय आहे. डनावानुसार मराठीमध्ये यादी प्रसिद्ध करावी तसेच त्या यादीचा फलक तहसील कार्यालयाच्या बोर्डवर लावावा. असेही कुकडे म्हणाले आहेत.