स्वातंत्र्य सेनानींना मानवंदना देत विद्या प्रतिष्ठानमध्ये स्वातंत्र्य दिन

इंदापूर (पुणे) : विद्या प्रतिष्ठान संकुलात आज (शुक्रवार) सकाळी ८ वाजता स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्या प्रतिष्ठान कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण संदीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी इंदापूर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत आणि देशप्रेम जागवणारे नाटक सादर केले. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी विविध सोशल फ्रीडम फायटर्सच्या वेशभूषा करून एक नाटक सादर केले. प्राचार्य डॉ. संदीकर यांनी स्वातंत्र्य संग्रामात योगदान देणाऱ्या सर्व स्वातंत्र्य सेनानी आणि हुतात्म्यांचे स्मरण करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या प्रसंगी पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे तसेच इंदापूर इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या डॉ. ज्योती जगताप उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *