आमदार पाटील‌ यांच्या वाढदिवसानिमित्त २३ ला विविध सामाजिक उपक्रम

करमाळा (सोलापूर) : आमदार नारायण पाटील‌ यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी (ता. २३) विविध उपक्रम राबविले जाणार आहेत, अशी माहिती वाढदिवस संयोजन समितीच्या वतीने देण्यात आली आहे. बुधवारी (ता. २०) चिखलठाण येथे नेत्र तपासणी शिबीर होणार आहे. गुरुवारी (ता. २१) कुर्डुवाडी येथे रोजगार मेळावा होणार आहे. डॉ. भारत पाटील फाऊंडेशन व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सोलापूर यांच्या वतीने हा रोजगार मेळावा होणार आहे. गणेश हॉल (वागळे हॉस्पिटल शेजारी) येथे हा मेळावा होणार आहे. राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष संतोष वारे यांच्या वतीने मुकबधीर विद्यालय करमाळा (श्री देवीचा माळ) येथील मुकबधीर विद्यार्थ्यांना स्नेह भोजन व रावगाव या करमाळा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वही वाटप होणार आहे.

नारायण आबा पाटील‌ मित्रमंडळ व वनविभाग करमाळाच्या वतीने तालुक्यातील गायरानमध्ये ५००० वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे. शनिवारी (ता. २३) जेऊर येथे आरोग्य तपासणी व औषध वाटप शिबीर होणार आहे. त्यानंतर दुपारी १ वाजता जेऊर येथे आमदार नारायण पाटील‌ यांचा नागरी सत्कार होणार आहे. याशिवाय करमाळा मतदार संघात विविध ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप, खाऊ वाटप होणार असल्याची माहिती संयोजन समितीने दिली. यावेळी माजी सभापती अतुल पाटील, माजी सभापती गहिनीनाथ ननावरे, जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील, संतोष वारे, प्रा. अर्जुनराव सरक, डॉ. प्रा. संजय चौधरी, राजाभाऊ कदम, रामेश्वर तळेकर, विकास गलांडे, राजुशेठ गादिया, नागेश झांजुर्णे, संदिप कोठारी, उमेश कांडेकर, संतोष वाघमोडे, किरण पाटील, संजय फडतरे, राहुल गोडगे, सुर्यकांत पाटील, सुनील तळेकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *