निंभोरेच्या सरपंचानी दिला दहावीतील यशस्वी विद्यार्थिनीला ध्वजारोहणचा मान

करमाळा (सोलापूर) : निंभोरे येथे स्वातंत्र्यदिना निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व श्री छत्रपती संभाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. यामध्ये ‘जय जवान जय किसान’, वंदे मातरम यासारख्या घोषणा देण्यात आल्या. सरपंच रविंद्र वळेकर यांनी ग्रामपंचायत कार्यालयातील ध्वजारोहणाचा मान स्वतः न घेता दहावीमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेली विद्यार्थिनी दिव्या मारकडला दिला. तिच्या हस्ते ध्वजारोहण करून गावासाठी आदर्श व सन्माननीय असा आदर्श घालून दिला. त्यांच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये ध्वजारोहणासाठी मान मिळवण्याचा एक आदर्श उपक्रम राबविण्यात आला.

ध्वजारोहणानंतर श्री संत ज्ञानेश्वर महाराज माऊली यांच्या प्रतिमेचे पूजन करून पसायदानाचा कार्यक्रम ग्रामपंचायत निंभोरे येथे राबविण्यात आला. महिला व बालविकास विभागाकडून देण्यात येणारा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण ग्रामपंचायतकडून करण्यात आले. हा पुरस्कार ज्या महिलांनी महिलांसाठी प्रोत्साहनपर काम केले व महिलांचे विविध क्षेत्रातील मनोबळ वाढवण्याचे काम केले अशा महिलांना हा पुरस्कार देण्यात आला.

या पुरस्काराचे मानकरी निंभोरे गावातील सुनिता वळेकर (अंगणवाडी सेविका) व सुषमा वाघमारे (सीआरपी उमेद अभियान) या दोन महिलांना देण्यात आला. सुनीता वळेकर यांनी लाडकी बहीण योजना व लेक लाडकी योजनेत गावातील महिलांसाठी भरीव काम केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *