करमाळा (सोलापूर) : ‘तुम्ही आम्हाला कट का मारला? असे विचारले तेव्हा तेव्हा दोन भावाला शिवीगाळ करून मारहाण करत ब्लेडने वार केले असल्याचा प्रकार आवाटी येथे एसटी स्टँड चौकात घडला आहे. यामध्ये चौघांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. हातावर, कोपराजवळ, पोटरीवर, पोटावर व पाठीवर ब्लेड मारून जखमी केले. असल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे.
एकाच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध हा गुन्हा दाखल झाला आहे. मोहसीन बडेमिया पटेल, बडेमिया रसूल पटेल, तन्वीर बडेमिया पटेल व बाबा अब्दुल खान अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीची नावे आहेत. यामध्ये सोहेल अफसर जहागीरदार (वय 31, व्यावसाय शेती, रा. आवाटी) यांनी फिर्याद दिली आहे.
एकाने चाकू मारला, दुसऱ्याने मानेवर पाय दिला भावाला कट का मारला? म्हणत एकाला नऊजणांकडून बेदम मारहाण
फिर्यादी जहागीरदार यांनी म्हटले आहे की, गुन्हा दाखल झालेला संशयित आरोपी मोसिन बडेमिया पटेल यांनी त्याच्या ताब्यातील चारचाकी आम्हाला घासून घेऊन गेला. गावातील एसटी स्टँडवर आम्ही गप्पा मारीत उभा होतो. तेव्हा त्याने आम्हाला घासून गाडी नेली. त्यानंतर थोडे पुढे जाऊन त्यानी ताब्यातील गाडी उभा केली. गाडीमधून मोसिन बडेमिया पटेल, बडेमिया रसूल पटेल, तनवीर बडेमिया पटेल व बाबा अब्दुल खान हे संशयित आरोपीखाली उतरले.
त्यांना ‘तुम्ही आम्हाला कट का मारला? असे विचारले असता त्यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. मोहसीन पटेलने हातातील ब्लेडने कोपराजवळ, पाठीवर व पोटावर मारून जखमी केले. तेव्हा तेथील जमलेल्यांनी आमचा वाद सोडवला. ‘तुम्ही पुन्हा आमच्या नादाला लागला तर तुम्हाला गाठून मारीन गावामध्ये सरपंच व उपसरपंच हे आमचे आहेत, आम्ही तुम्हाला काहीही करून मारू असे म्हणत जीव मारण्याची धमकी दिली. हा प्रकार ४ तारखेला रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास आवटी बस स्टॅन्ड चौकात घडला आहे.