Breaking There will be a rehearing in Karmala on the application disqualified in the Makai electionBreaking There will be a rehearing in Karmala on the application disqualified in the Makai election

करमाळा : मकाई निवडणुकीत अपात्र ठरवण्यात आलेल्या १४ उमेदवारांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल आला असून यामध्ये बागलविरोधी गटाला दिलासा मिळाला आहे. रिटर्निंग ऑफिसर (निवडणूक निर्णय अधिकारी) यांच्या समोर शुक्रवारी (ता. ९) सकाळी ११ वाजता उपस्थित राहून अपील केलेल्या उमेदवारांना म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर संबंधित रिटर्निंग ऑफिसरने सुधारित आदेश पारित करावेत, असेही आदेश दिले आहेत. त्या सुधारित आदेशानुसार पुढची कार्यवाही करावी, असे सांगितले आहे. त्याचबरोबर जर आम्हाला रिटर्निंग ऑफिसरचे म्हणणे मान्य नसेल तर पुढील प्रक्रियेसाठी आम्हाला पुन्हा संधी उच्च न्यायालयाने दिलेली आहे, असे प्रा. रामदास झोळ यांनी सांगितले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *