कोंढारचिंचोलीजवळील अपघातप्रकरणात एका अनोळखीविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये पोलिस हेडकॉन्स्टेबल संतोष देवकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून हा गुन्हा दाखल झाला आहे. २५ ऑगस्टला रात्री साडेदहावाजताच्या सुमारास हा अपघात झाला होता. या अपघातात गंभीर जखमी होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. महादेव पाटीलबा खेडकर (वय ४६, रा. पाटस, ता. दौड, जि. पुणे) असे त्यांचे नाव आहे. खेडकर हे मोटारसायकलवर जात असताना कोंढारचिंचोलीजवळ त्यांच्या मोटारसायकलला भरधाव वेगात आलेल्या एका अज्ञात वाहनाने धडक दिली. धडक देऊन वाहनचालक निघून गेला. त्यानंतर जखमी खेडकर यांना भिगवण येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा मृत्यू झाला.
