करमाळ्यात लव जिहादचा प्रकार? मोबाईलवर फोटो पटवून केले ब्लॅकमेल! पीडितेच्या तक्रारीवरून करमाळ्यात गुन्हा दाखल

करमाळा शहरात लव जिहादचा प्रकार घडल्याची चर्चा सुरु झाली आहे. एका मुलीस प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अत्याचार केला. त्यानंतर तिचा विवाह ठरल्यानंतर संबंधिताना सोशल मीडियावर फोटो पाठवून तिला ब्लॅकमेल केल्याची माहिती आहे. याबाबत पोलिस ठाण्यात अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून संशयित आरोपी ताब्यात घेण्यात आला आहे.

उपलब्ध माहितीनुसार संबंधित पीडिता व संशयित आरोपी यांची ओळख निर्माण झाली. त्यानंतर त्याने संपर्क वाढवून तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्याने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. दरम्यान तिचे फोटोही मोबाईलमध्ये काढले. त्याने तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला व धमकीही दिली, असे सांगितले जात आहे.
तू माझी पत्नी आहे असे सांगून वारंवार अल्पवयीन मुलीवर अत्याचार! प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर करमाळ्यात प्रकार उघडकीस, तिघांवर गुन्हा दाखल

मुलगी सज्ञान असल्याने संबंधित कुटुंबीयांनी तिच्यावर कोणताही दबाव आणला नाही. मात्र तिलाच स्वतःची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे ती त्याच्यापासून दूर झाली होती. कुटुंबीयांनी यामध्ये हस्तक्षेप न करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान पीडितेच्या इच्छेनुसार त्यांनी स्थळ पाहिले होते. संशयित आरोपी पीडितेला ब्लॅकमिल करून बळजबरी करत होता. विवाह ठरल्यानंतर त्याने सासरच्या मंडळींना मोबाईलवर फोटो पाठवून बदनामी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पीडितेने पोलिसात धाव घेतली असल्याची माहिती समजत आहे. या प्रकरणात करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला असून या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

पुन्हा आणखी एक घटना! करमाळा तालुक्यात नेमकं काय सुरु आहे? IPS अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली ‘निर्भया’ पथकाची धाडसी कारवाई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *