माढ्यात धैर्यशील मोहिते पाटील लढण्यावर ठाम

Madha Loksbha Even though Tutari has not decided Mohite Patil village visit continues saying it our decision

अकलूज (सोलापूर) : माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील हे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निवडणूक लढवणार आहेत, अशी माहिती माळशिरसचे जेष्ठ नेते जयसिंह उर्फ बाळदादा मोहिते पाटील यांनी दिली माध्यमांशी बोलताना दिली आहे. माढा लोकसभा मतदार संघात भाजपने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर मोहिते पाटील नाराज झाले होते. त्यानंतर ते काय भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच बाळदादा यांनी केलेले विधान चर्चेत आले आहे. मात्र याची अधिकृत घोषणा कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

बाळदादा म्हणाले, लोकसभा निवडणुकीत माढा, बारामती व कोल्हापूर या ठिकाणी भाजपचा उमेदवार निवडून येऊ शकत नाही. यासोबतच माण, करमाळा, माळशिरस व सांगोला या ठिकाणी विधानसभेलासुद्धा नक्कीच फटका बसणार आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. अकलूज येथे पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला तेव्हा धैर्यशील मोहिते पाटील हेही उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *