Agriculture department appeals to beneficiaries of lottery to purchase implements in time

करमाळा (सोलापूर) : जिल्हा परिषदेकडून कृषी अवजारांसाठी राबविण्यात आलेल्या अनुदान योजनेची जानेवारीमध्ये लॉटरी झाली होती. मात्र अनेकांनी अवजारे खरेदी केली नाहीत. त्यांनी ३१ मार्चपूर्वी अवजारे खरेदी करावी, असे आवाहन करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी केले आहे.

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना कृषी अवजारे मिळावीत यासाठी योजना राबवली जाते. याची लॉटरी जिल्हा स्तरावर जानेवारीत निघाली होती. या लॉटरीच्या यादीतील प्रतिक्षा यादीत असणाऱ्या लाभार्थ्यांनी 31 मार्चपूर्वी आपल्या नावसमोरील वस्तू खरेदी करणे आवश्यक आहे. जर वेळेत खरेदी झाली नाही तर अनुदान मिळणार नाही. प्रतिक्षा यादीतील लाभार्थ्याने 31 मार्चपूर्वी वस्तू घेणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : मनोज म्हेत्रे, कृषी विस्तार अधिकारी, पंचायत समिती, करमाळा, मो. नं. 9545740999.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *