छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळ्यात बुधवारी निघणार भव्य मिरवणूक

करमाळा (सोलापूर) : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी (ता. १४) सायंकाळी ४ वाजता करमाळ्यात भव्य मिरवणूक निघणार आहे. पोथरे नाका येथे सकाळी ९ वाजता राज्यभिषेक सोहळा होणार आहे. मिरवणुकीदरम्यान आकर्षक मर्दानी खेळ, दांडपट्टा, तलवारबाजी याचे प्रात्यक्षिक बाल गोपाळासह युवक वर्ग उपस्थित राहून विविध प्राचीन युद्ध कलेचे दर्शन सर्व करमाळाकरांना आपल्या कलेद्वारे घडवणार आहेत. याचा लाभ समाज बांधवांनी घ्यावा, असे आवाहन छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती करमाळा शहर व तालुकाच्या वतीने केले आहे.

परकीय आक्रमाणाच्यावेळी अनेक लढाया जिंकून नागरिकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्यासोबतच स्वराज्यासाठी प्रसंगी मृत्यूलाही कसे सामोरे जावे याचा आदर्श छत्रपती संभाजी महाराज यांनी समाजासमोर ठेवला. त्यांचे बलिदान आजही देशप्रेमाची प्रेरणा देणारे आहे. छत्रपती संभाजी महाराज युद्धात तरबेज होते तसेच ते न्यायनिवाडा करण्यात निष्णात होते. आदर्श प्रशासन कसे असावे याचा आदर्श त्यांनी समोर ठेवला. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती उत्सव समितीच्या करमाळाच्या वतीने बुधवारी पोथरे नाका येथे सकाळी ९ वाजता राज्यभिषेक सोहळा होणार आहे. यासाठी सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दुपारी ४ वाजता छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक करमाळा शहरातील प्रमुख मार्गावरून निघणार आहे. या मिरवणुकीमध्ये आकर्षक मर्दानी खेळ, दांडपट्टा, तलवारबाजी याचे प्रात्यक्षिक बाल गोपाळासह युवक वर्ग उपस्थित राहून विविध प्राचीन युद्ध कलेचे दर्शन सर्व करमाळाकरांना आपल्या कलेद्वारे घडवणार आहेत. या मिरवणुकीमध्ये समाज बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती करमाळा शहर व तालुकाच्या वतीने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *