करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातून एका अल्पवयीन मुलीला अनोळखी व्यक्तीने कशाचे तरी आमिष दाखवून पळवून नेले आहे. याप्रकरणात पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित मुलगी पुण्यातील आहे. शाळेत जाते म्हणून ती पुण्यातील घरातून गेली होती. मात्र पुन्हा ती घरी गेली नाही. दरम्यान नातेवाईकांनी तिचा इतरत्र शोध घेतला तेव्हा ती करमाळ्यातील नातेवाईकांकडे आली असल्याची माहिती समजली. पुण्यातून तिला नेण्यासाठी येत असताना करमाळ्यातील नातेवाईकांपासूनही ती काहीही न सांगता गेली आहे. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिचा इतरत्र शोध घेतला मात्र ती मिळवून आली नाही. त्यानंतर याप्रकणात भादवी १८६० च्या कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

