Appeal to fill ITI December 2023 Supplementary Examination form by 18th OctoberAppeal to fill ITI December 2023 Supplementary Examination form by 18th October

सोलापूर : आयटीआय अनुत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांची सीबीटी इंजिनिअरिंग ड्रॉईंग व प्रात्यक्षिक या विषयांची अन्युअल पॅटर्न पुरवणी परीक्षा डिसेंबर 2023 मध्ये होणार आहे. त्यानुसार सन 2018 प्रवेशित दोन वर्षे कालावधीच्या व्यवसाय अभ्यासक्रमाचे प्रशिक्षणार्थी व 2019 प्रवेशित एक वर्ष कालावधीच्या व्यवसाय अभ्यासक्रमाचे प्रशिक्षणार्थी आणि जुलै /ऑगस्ट 2023 च्या अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेपासून वंचित व अनुत्तीर्ण राहिलेले प्रशिक्षणार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा डिसेंबर 2023 ची प्रात्यक्षिक विषयांची परीक्षा दि.01 डिसेंबर 2023 ते 06 डिसेंबर 2023 या कालावधीत तसेच सीबीटी परीक्षा 10 डिसेंबर 2023 पासून ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे कळविले आहे.

तरी प्रवेशित ॲन्युअल पॅटर्न माजी प्रशिक्षणार्थ्यांनी व इच्छुक रिपीटर प्रशिक्षणार्थ्यांनी दि. 18 ऑक्टोबर 2023 पूर्वी परीक्षा फॉर्म भरावेत. अधिक माहितीसाठी संस्थेमध्ये समक्ष भेटावे, असे आवाहन विजापूर रोड आयटीआय येथील प्राचार्य ए. डी. जाधवर यांनी केले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *