करमाळा (सोलापूर) : कै. बाबूराव तात्या गायकवाड प्रतिष्ठाणच्या वतीन करमाळा शहर व तालुक्यातील गरजु रुग्णांसाठी मोफत बेड सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधाचे उद्घाटन होताच पहिल्या तासातच सर्व बेड रुग्णांच्या नातेवाईकांनी नेले आहेत. त्यामुळे करमाळ्यात पहिल्यांदाच सुरु झालेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कै. बाबूराव तात्या गायकवाड प्रतिष्ठाण सतत सर्वसामान्य माणसांची गरज ओळखून वेगवेगळे उपक्रम राबवत असते. रुग्णांना घरी पाठवल्यानंतर तेथे चांगला बेड मिळत नाही. याचा परिणाम त्याच्या आरोग्यावर होतो. नातेवाईक देखील चिंतेत असतात काहीजणांची बेड खरेदीची परस्थिती नसते. हिच गरज ओळखून प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष सचिन गायकवाड यांनी करमाळ्यात ही सुविधा सुरु केली आहे.
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन येथेच या सेवेचा प्रारंभ करण्यात आला आहे. यावेळी सामाजिक, राजकीय व शैक्षणिक अशा सर्व क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होते. मराठा सेवा संघाचे सचिन काळे, पत्रकार विशाल घोलप व पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष महेश चिवटे यांनी मनोगत व्यक्त करुन या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत.
माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे, मनसेचे तालुकाध्यक्ष संजय घोलप, सतिश फंड, अरुणकाका जगताप आदी यावेळी उपस्थित होते.