Navodaya Vidyalaya Pokharapur continues the tradition of success of Gurukul Public School

करमाळा (सोलापूर) : गुरुकुल पब्लिक स्कूलमधील विद्यार्थिनी स्वरा ओंभासेची निवड नवोदय विद्यालय पोखरापूर येथे झाली आहे. गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये स्कॉलरशिप नवोदय सैनिकी स्कूल या सर्व परीक्षांची अतिशय उत्तमरीत्या तयारी करून घेतली जाते. त्यासाठी दिवाळीच्या अगोदरच सर्व स्पर्धा परीक्षांचा सिल्याबस पूर्ण करून घेतला जातो. दिवाळीनंतर फक्त विविध प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या जातात. त्यासाठी विविध जिल्ह्यातून विविध प्रकाशनच्या प्रश्नपत्रिका तसेच प्रश्नसंच मागवून त्यांचा सराव करून घेतला जातो. संपूर्ण प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित सोडवून घेतल्या जातात. त्यात चुकलेल्या प्रश्न प्रकारांचा सराव करून घेतला जातो. विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधानकारक निरसन केले जाते. त्यामुळेच आजही गुरुकुल पब्लिक स्कूलची नवोदय मधील यशाची परंपरा कायम आहे. या यशासाठी स्वराला गुरुकुल पब्लिक स्कूलचे संस्थापक नितीन भोगे, सचिवा रेश्मा भोगे, एचओडी सारिका शिंदे व शितल पवार, वर्गशिक्षिका लता नायकुडे यांनी मार्गदर्शन केले.

Discussion in the political circles on Mohite Patil entry into the Madha Lok Sabha constituency

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *