करमाळा (सोलापूर) : धनगर समाजाला ‘एसटी’तून आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीचे आज (मंगळवारी) धनगर समाजाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. धनगर समाजाला सरकारने दिलेली ५० दिवसांची मुदत संपली असल्याने आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आदेशाने हे निवेदन देण्यात आले आहे. करमाळ्यात निवेदन देतेवेळी धनगर समाजाचे बांधव उपस्थित होते. ‘धनगर समाजाला एसटीतून आरक्षण मिळालेच पाहिजे’, ‘कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही’, ‘आमदार गोपीचंद पडळकर तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है’, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.