करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरात फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सुनील सावंत यांनी केली आहे. या कुत्र्यांचा बंदोबस्त झाला नाही तर शुक्रवारी (ता. २४) सकाळी ११ वाजता करमाळा नगरपालिकामध्ये भटके कुत्रे आणुन सोडु, असा इशारा निवेदनाव्दारे मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांना दिला आहे. करमाळा शहरात मोकाट कुत्रांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शहरातील गल्ली बोळात असणारे भटके कुत्रे लहान मुलांना चावत आहेत. रात्री- अपरात्री नागरीकांना रस्त्यावरुन जाताना अंगावर येऊन जखमी करत असल्याचे शहरात दिसत आहे. आता शाळा सुरु होणार असुन लहान लहान मुले शाळेत जाताना भटके कुत्रे हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वेळीच या भटक्या कुत्र्याचा बंदोबस्त करावा.
करमाळ्यातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
