A twentyfif year old youth from Shetphal was killed in an accident

करमाळा (सोलापूर) : मित्रांबरोबर एका हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा करून जेवण केल्यानंतर घरी परतताना अपघात होऊन शेटफळ येथील २५ वर्षाचा तरुण ठार झाला आहे. विकी जयसिंग डिगे असे या तरुणाचे नाव असून रविवारी (२८ जानेवारी) रात्री ११ वाजता टेंभुर्णी- नगर मार्गावर जेऊर महावितरण कार्यालयाजवळ ही दुर्दैवी घटना घडली. यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वाढदिवसाच्या दिवशीच त्याला मृत्यने गाठल्याने त्याचा जन्मदिनच मरणदिन ठरला आहे.

विकी डिगेचा २८ जानेवारीला पंचवीसावा वाढदिवस होता. विकी हा आई- वडिलांना एकुलता एक मुलगा होता. आई- वडील मोलमजुरी करतात, तर तो स्वतः केळी खरेदीचा व्यावसाय करत होता. एकूलत्या एक कमवता मुलाच्या आशा अपघाती मृत्यूमुळे या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून या घटनेनंतर या परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

रविवारी सायंकाळी ८ वाजता मित्रांनी फेटा बांधून केक कापून त्याचा वाढदिवस साजरा केला होता. त्यानंतर शेलगाव येथील मित्रांनी वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याला शेलगाव चौक येथे बोलावले. तिथे वाढदिवस साजरा करून जेवण करून रात्री ११ वाजताच्या दरम्यान घरी परतत असताना शेलगाव- जेऊर रस्त्यावर महावितरण कार्यालयाच्या दरम्यान रस्त्यावर एका वाहनाची धडक होऊन झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला. हा अपघात एवढा जबरदस्त होता की अपघातानंतर गाडीने पेट घेतला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली उपचारासाठी त्याला करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *