करमाळा तालुक्यातील शेटफळ येथील एका तरुणाने प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात मोटारसायकलवर जात कुंभस्नान केले. अनेक आखाड्यांच्या शाही मिरवणुका आणि त्यांचा मान यांच्यामुळे या स्नानांना ‘शाही स्नान’ म्हणण्याची प्रथा आहे. प्रयागराजमध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या सुमारे ४० कोटी आहे. हा आकडा कल्पनेच्या पलीकडे आहे. साधारण १८३ देशांमधील भाविकांनी या कुंभमेळ्याला भेटी दिल्याची माहिती आहे.
शेटफळ येथील तरुण मनोज जाधव यांनाही महाकुंभमेळ्याची माहिती ऐकून प्रयागराजला कुंभस्नान करण्याची इच्छा झाली. तेथे जाण्याची तयारी केल्यानंतर रेल्वेचे आरक्षण फुल्ल झाल्याचे दिसले. मात्र कुंभस्नानाची उत्कट इच्छा मनात असताना जाण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यावर मनातील इच्छा गप बसू देत नव्हती. अनेकांना विचारलं सोबत कोणच येण्यास तयार नाही शेवटी पट्ट्याने मोटरसायकल घेतली आणि मोबाईलवर लोकेशन टाकत प्रयागराजच्या दिशेने गेला. 72 तासात साधारण अडीच हजारपेक्षा जास्त किलोमीटरचा प्रवास करून तो कुंभस्नान करूनच घरी परतला. या जिद्दीबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.