Pramod Bodke appointment on the Accreditation Committee of the State GovernmentPramod Bodke appointment on the Accreditation Committee of the State Government

सोलापूर : राज्यातील प्रसार माध्यमांशी संबंधित पात्र व्यक्तींना अधिस्विकृती पत्रे देण्यासाठी राज्य सरकारची राज्यस्तरीय अधिस्विकृती समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या सदस्यपदी सोलापूर ‘सकाळ’चे शहर बातमीदार प्रमोद बोडके यांची निवड झाली आहे. या संदर्भातील सरकार निर्णय सामान्य प्रशासन विभागाने प्रसिध्द केला आहे.

राज्य सरकारच्या या समितीत राज्यातील २७ पत्रकारांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य श्रमिक पत्रकार संघाचे उपाध्यक्ष म्हणून बोडके सध्या कार्यरत आहेत. राज्य श्रमिक पत्रकार संघाच्या कोट्यातून त्यांची या समितीवर निवड झाली आहे. बोडके यांनी यापूर्वी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस म्हणून काम पाहिले आहे. समितीत निवड झालेल्या २७ जणांमधून समितीचा अध्यक्ष निवडला जाणार आहे.

राज्यातील पात्र पत्रकारांना सरकारच्या वतीने दिल्या जाणाऱ्या अधिस्विकृती पत्राच्या माध्यमातून मोफत एसटी प्रवास, सवलतीच्या दरात शासकीय विश्रामगृहात राहण्याची सुविधा यासह इतर लाभ दिले जातात. विविध माध्यमांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना सरकारची अधिस्विकृती पत्रे देण्यासाठी राज्य व विभागस्तरीय समिती काम करते. राज्य अधिस्विकृती समिती व विभागीय अधिस्विकृती समित्यांमधील सदस्यांना समितीच्या बैठकांना उपस्थित राहण्यासाठी वर्ग एकच्या अधिकाऱ्यांप्रमाणे प्रवासभत्ता व दैनिकभत्ता दिला जातो. या निवडीबद्दल राज्य श्रमिक संघाचे मार्गदर्शक यदू जोशी, अध्यक्ष प्रदीप मैत्र यांनी त्यांचे अभिनंदन केले आह.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *