लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणार्या संशयिताना अटक करा या मागणीसाठी करमाळ्यात तरुणाचे उपोषण

करमाळा (सोलापूर) : लग्नाच्या नावाखाली फसवणूक केल्या प्रकरणातील दाखल गुन्ह्यातील संशयीत आरोपींना अटक करावी या मागणीसाठी गुळसडी येथील एकाने पोलिस ठाण्यासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. सुनील भोसले असे उपोषणकर्त्याचे नाव आहे तर गुन्हा दाखल असलेले संशयित हे पिंपळवाडी येथील आहेत. लग्नाच्या नावाखाली फसवणूक झाली असल्याचे उपोषणकर्ते भोसले यांचे म्हणणे आहे. भोसले यांनी न्यायालयात तक्रार केल्यानंतर संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. मात्र त्यांच्याविरुद्ध कारवाई होत नसल्याचा आरोप भोसले यांचा असून त्यांना अटक करण्याची मागणी केली जात आहे. याप्रकरणातील ५ अॉक्टोबरला गुन्हा दाखल झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *