YuvaSena Shanbhuraje Phadtare warning to Karmala administration for sugarcane transportersकरमाळा : तहसील कार्यालयासमोर उसतोड मजूरांकडून फसवणूक झालेल्या वाहतुकदारांचे गुन्हे दाखल करून घ्यावेत या मागणीसाठी झालेल्या आंदोलनावेळी बोलताना युवासेनेचे शंभूराजे फडतरे व इतर.

करमाळा (सोलापूर) : ‘ऊसतोड मजूर देतो म्हणून फसवणूक केलेल्या उस वाहतूकदार व वाहनमालकांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही’, असा इशारा युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी आज (सोमवार) दिला आहे. शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तहसील व पोलिस निरीक्षक कार्यालयासमोर उसतोड मजूरांकडून फसवणूक झालेल्या वाहतुकदारांचे गुन्हे दाखल करून घ्यावेत या मागणीसाठी युवासेनेच्या वतीने घंटानाद आंदोलन झाले. दरम्यान ‘ज्यांच्याकडे पुरावे असतील त्यांचे तात्काळ गुन्हे दाखल करून घेतले जातील,’ असे आश्वासन पोलिस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांनी दिले. प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव व गुंजवटे यांनी निवेदन स्विकारले.

फरतडे म्हणाले, तालुक्यातील उसक्षेत्र व कारखाने यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या अनेक सुशिक्षित बेरोजगार युवकांनी विविध बॅंक, फायनान्स तसेच सावकारी कर्ज काढून वाहने व उसतोड टोळ्या करून उस वाहतूक व्यवसाय सुरू केला होता. मात्र काही उसतोड मुकादमांनी पैसे घेऊन कामगार (कोयते) दिले नसल्याने अनेक युवक कर्जबाजारी झाले आहेत. ज्या वाहतूकदारांकडे नोटरी, चेक, बॅंक व्यवहार तपशील असेल त्यांचे गुन्हे दाखल करून घ्यावेत, विशेष पथक तयार करून याचा तपास करून पैसे मिळवून देण्यात यावेत अशी अग्रही मागणी त्यांनी केली.

उसवाहतुकदार यांच्या जोरावरच कारखाने सुरू आहेत. कारखानदारांकडून यांना उचल देण्यात येते परंतु टोळी न आल्यास व उस पुरवठा न झाल्यास कारखानदारांकडून उस वाहतूकदारांवर गुन्हे दाखल होतात. मात्र कारखाना व लोकप्रतिनिधींकडून मात्र उस वाहतूकदारांची कोट्यावधींची फसवणूक होवुन देखील दखल घेतली जात नाही हे दुर्दैव असल्याचे देखील फरतडे यांनी नमूद केले.

माजी तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे, माजी उप तालुकाप्रमुख अ‍ॅड. विकास जरांडे, श्रीहरी तळेकर, युवासेना उपजिल्हाप्रमुख मयुर यादव, शिवसेना शहरप्रमुख प्रवीण कटारिया, तालुका सरचिटणीस पांडुरंग ढाणे, उपशहरप्रमुख संतोष गानबोटे, पंकज परदेशी, युवासेना उपशहरप्रमुख कल्पेश राक्षे, आदित्य जाधव, युवासेना उपशाखा प्रमुख मयुर तावरे, अनिकेत नवगन, भाऊ मस्तुद, विनोद पाटील, बाळराजे फरतडे, पप्पू निकम, सुरज पुजारी, दत्ता डौले, शेटफळ येथील उसवाहतुकदार चंद्रकांत लबडे, सोगाव येथील स्वप्नील गोडगे, वडशिवणे येथील बालाजी देवकर, टकाळी येथील गोरख काकडे, कावळवाडी येथील येताळ हाके, मांगी येथील गणेश नरसाळे, टाकळी येथील हरी गुळवे आदी उपस्थित होते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *