करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे लीगल ऍडव्हायझर म्हणून ऍड. नितीन गपाट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे पत्र कारखान्याचे कार्यकारी संचालक अरुण बागनवर यांनी ऍड. गपाट यांना दिले आहे. ११ ऑगस्टपासून त्यांची ही नियुक्ती झालेली असून १० ऑगस्टला झालेल्या प्रशासक मंडळाच्या सभेत त्यांची ही निवड झाली आहे. कारखान्यासंदर्भात सुरु असलेल्या करमाळा न्यायालयातील दिवाणी व फोजदारी केसेस संदर्भातील प्रशासक मंडळाची बैठक झाली. त्यावेळी ही निवड करण्यात आली आहे.

