ek hat madticha under Revenue week at Karmala Talathi officeek hat madticha under Revenue week at Karmala Talathi office

करमाळा (सोलापूर) : किल्ला वेस येथील करमाळा तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयामध्ये ‘महसूल सप्ताह’ अंतर्गत ‘एक हात मदतीचा’ या कार्यक्रमांमध्ये विशेष सहाय्य योजना अंतर्गत संजय गांधी निराधार योजनाबाबतची प्रकरणे मंजूर करून लाभार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी करमाळा मंडळ अधिकारी राजेंद्र राऊत, मांगीचे तलाठी हनुमंतराव ढवळे, जातेगावचे तलाठी मनोज सूर्यपुजारी, करमाळ्याचे तलाठी सतिश बिजले, बिटरगाव श्री येथील गणेश माने, पोथरेचे रवींद्र जाधव, मांगीचे अशोक गवळी, समीर बागवान, राजेंद्र कुंभार, चेतन ढाळे, नागेश कांबळे, राष्ट्रवादीचे तुषार शिंदे आदी उपस्थित होते. आभार सिद्धार्थ काळे यांनी मानले. यावेळी मंडळ अधिकारी राऊत यांनी सरकारकडून दिल्या जाणाऱ्या योजनांची माहिती सांगितली. प्रांताधिकारी समाधान घुटुकडे प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव, महसुलाचे नायब तहसीलदार शैलेश निकम, नायब तहसीलदार बाबासाहेब गायकवाड आदींच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *