Adv Ghadge A health camp at Karmala to mark the death anniversary

करमाळा (सोलापूर) : केशव प्रतिष्ठान, शिवरत्न ग्रामीण सेवाभावी संस्था, सर्वोदय प्रतिष्ठान व तरटगाव ग्रामस्थांच्या वतीने करमाळा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष ज्येष्ठविधीज्ञ ॲड. नानासाहेब घाडगे यांच्या चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त डॉ. अमोल घाडगे व डॉ. स्वाती घाडगे यांनी करमाळा येथे आरोग्य शिबिर घेतले.

ॲड. घाडगे यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून शिबिराची सुरुवात झाली. करमाळा उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक गजानन गुंजकर यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. करमाळा मेडिकोज गिल्ड व करमाळा तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य यावेळी उपस्थित होते. बार्शी येथील कॅन्सर तज्ञ डॉ. राहुल मांजरे पाटील, हृदयरोग तज्ञ डॉ. विकास खामकर (बार्शी), दंत तज्ञ डॉ. विजयसिंह तनपुरे यांच्यासह श्रवण यंत्र संदर्भातील तपासणी पुणे येथील श्री. शुक्ला व श्री. सिंग यांनी केली. शिबिरामध्ये १८४ रुग्णांची तपासणी करण्यात आली.

डॉ. श्रीराम परदेशी, डॉ. वसंत पुंडे, डॉ. केमकर, डॉ. रोहन पाटील, डॉ. कविता कांबळे, डॉ. वर्षा करंजकर, डॉ. पोपट नेटके, डॉ. हर्षवर्धन माळवदकर, डॉ. अशोक शिंदे, डॉ. अशितोष कापले, डॉ. विठ्ठल पवार, डॉ. कुलकर्णी, राजेंद्र घळके, धनराज मोरे, राजकुमार घाडगे, किरण वाळुंजकर, मिलिंद माने, अरविंद घाडगे, अमोल बावडकर, राम घाडगे, मनोज कुलकर्णी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवरत्न संस्थेचे अध्यक्ष अमरजीत साळुंके यांनी केले., प्रास्ताविक डॉ. अमोल घाडगे यांनी तर आभार केशव प्रतिष्ठानचे अध्यक्ष जगदीश अग्रवाल यांनी मानले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *