Adv Rahul Sawant felicitated at Karmala by MLA Sanjay Shinde

करमाळा (सोलापूर) : सोलापूर जिल्हा नियोजन समितीवर (डीपीसी) नियुक्ती झाल्यानंतर आज (शुक्रवारी) आमदार संजयमामा शिंदे यांच्या उपस्थितीत अॅड. राहुल सावंत यांचा सत्कार झाला. आमदार शिंदे यांच्या कार्यालयात झालेल्या या सत्कारावेळी आमदार शिंदे गटाचे समर्थक चंद्रहास निमगिरे, तरटगाव येथील हरीदास मोरे, तात्यासाहेब पाटील आदी उपस्थित होते.

अजित पवार यांनी सत्तेत सहभाग घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला सोलापुरात जिल्हा नियोजन समितीवर सहाजणांची वर्णी लागली आहे. त्यात करमाळा तालुक्यातून आमदार शिंदे यांच्या शिफारसीने अॅड. सावंत यांना संधी मिळाली आहे. या निवडीमुळे त्यांचा सोलापुरातही सत्कार झाला होता. हिवाळी अधिवेशन असल्याने आमदार शिंदे हे नागपुरात होते. त्यानंतर ते आज करमाळा कार्यालयात आले होते. तेव्हा सावंत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तालुक्यातील अनेकजण उपस्थित होते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *