करमाळा तालुक्यात एका ठिकाणी अंगणवाडी सेविका व सात ठिकाणी मदतनीससाठी जाहिरात

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यात अंगणवाडी सेविका व मदतनीसच्या रिक्त जागा भरण्यासाठी फेर प्रसिद्धीकरण निघाले आहे. तालुक्यात काही ठिकाणी अंगणवाडीत काम करण्यासाठी इच्छुकांची स्पर्धा लागत आहे. तर काही ठिकाणी उमेदवारच मिळत नसल्याने रिक्त जागा कशा भरायच्या याचा प्रश्न निर्माण होऊ पाहत आहे.

करमाळा तालुक्यात मार्च एप्रिलमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीसच्या जागा भरण्यात आल्या होत्या. त्यातही काही जागा रिक्त राहिल्या होत्या. सरकारच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पअंतर्गत गावांमध्ये अंगणवाडी चालवल्या जातात. चिमुकल्या व गर्भवती महिलांना सकस आहार देण्याचे काम येथे केले जाते.

या गावांत सेविका व मदतनीस भरल्या जाणार
बिटरगाव वा येथे अंगणवाडी मदतीसची जागा भरली जाणार आहे. तर मलवडी, बिटरगाव वा, सांगवी, जेऊर, खातगाव, निलज व बाळेवाडी.

करमाळा तालुक्यात अंगणवाडी सेविका व मदतनीसच्या रिक्त जागा भरण्यासाठी प्रसिद्धीकरण देण्यात आले आहे. पात्र व इच्छुक महिलेनी ११ ते २५ ऑगस्टदरम्यान अर्ज दाखल करावा. काही अडचण आल्यास करमाळा पंचायत समिती परिसरातील कार्यालयात भेट द्यावी.

  • किरण सूर्यवंशी,
    बालविकास प्रकल्प अधिकारी,
    एकात्मिक बाल विकास सेवा योजना, करमाळा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *