करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील शेलगाव वांगी येथे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे शुक्रवारी (ता. १९) येणार आहेत. संत वामनभाऊ भगवान बाबा मंदिरासमोरील सभामंडपाचे उदघाटन त्यांच्या हस्ते होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजयमामा शिंदे हे असणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार जयवंतराव जगताप हे असणार आहेत. शुक्रवारी सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती आमदार शिंदे यांच्या संपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे.


