करमाळा (सोलापूर) : यावर्षी पाऊस लांबल्याने पाणी पातळीही खाली जाऊ लागली आहे. निम्मा जुलै महिना होत आला तरीही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचीही चिंता वाढली आहे. करमाळा तालुक्यातील मध्यम प्रकल्पापैकी एक असलेल्या मांगी तलावात सध्या फक्त १८. ६१ टक्के पाणीसाठा राहिला आहे.
करमाळा तालुक्यातील मांगी तलावाची पाणीक्षमता ३०.३९ दलघमी आहे. त्यापैकी ३०.२० दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. ५३२.५७ मीटर पाणी पातळी आहे. सध्या तलावात (१३ जुलैपर्यंत) ५.८१ दलघमी पाणी आहे. हे पाणी ०.२१ टीएमसी आहे. त्यातील उपयुक्त पाणीसाठा ५.६२ दलघमी म्हणजे ०.२१ टीएमसी असून ही टक्केवारी १८.६१ आहे.