शिंदे- बागल, पाटील यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, वंचितचे उमेदवार करमाळ्यात निवडणूक रिंगणात

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या केम गटात तिरंगी, वांगी व कोर्टी गटात दुरंगी, पांडे व वीट गटात चौरंगी व चिखलठाण गटात सर्वाधिक म्हणजे पाच उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. पंचायत समितीच्या गणामध्ये देखील असेच चित्र असून काही ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी, चौरंगी तर काही ठिकाणी आठ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरेल आहेत.

करमाळा तालुक्यात जिल्हा परिषदेचे सहा गट आहेत. त्यासाठी ३० तर पंचायत समितीचे १२ गण आहेत. त्यासाठी ४२ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये भाजपचे नऊ, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नऊ, काँग्रेसचे दोन, करमाळा तालुका विकास आघाडीचे १८ यांच्यासह शरद पवार यांची राष्ट्रवादी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना, वंचित बहुजन आघाडी व अपक्ष असे उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

पांडे गटात चौरंगी लढत होत आहे.
भाजप : रश्मी बागल
शरद पवार यांची राष्ट्रवादी : राणी वारे
राष्ट्रीय समाज पक्ष : गुणाबाई रंदवे
करमाळा तालुका विकास आघाडी : ज्योती सावंत

रावगाव गणात तिरंगी लढत होत आहे.
शरद पवार यांची राष्ट्रवादी : दीपाली कांबळे
भाजप (बागल गट) : संध्या कांबळे
करमाळा तालुका विकास आघाडी (पाटील गट) : साळूबाई लांडगे

पांडे गणात पाच उमेदवार रिंगणात आहेत.
शरद पवार यांची राष्ट्रवादी : शिवाजी जाधव
भाजप : अप्पा भोसले
करमाळा तालुका विकास आघाडी (पाटील गट) : स्वप्नील काळे
शिवसेना (उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे) : प्रदीप बनसोडे
अपक्ष : युवराज भोसले

वीट गटात चौरंगी लढत होत आहे.
भाजप : अश्विनी चिवटे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना : सुषमा तनपुरे
करमाळा तालुका विकास आघाडी : रत्नमाला राजेभोसले
अपक्ष : दीपाली वाघमोडे

हिसरे गणात सहा उमेदवार रिंगणात आहेत.
अजित पवार यांची राष्ट्रवादी (शिंदे गट) : भारत अवताडे
करमाळा तालुका विकास आघाडी (पाटील गट) : दत्तात्रय जगदाळे
शिवसेना (उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे) : गौतम रोडे
अपक्ष : समाधान फरतडे
शरद पवार यांची राष्ट्रवादी : कृती लावंड
राष्ट्रीय समाज पक्ष : अंगद देवकाते

वीट गणात तिरंगी लढत आहे.
करमाळा तालुका विकास आघाडी (पाटील गट) : मंगल जाधव
शिवसेना (उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे) : पूजा कानगुडे
भाजप : पूजा ढेरे

कोर्टी गटात दुरंगी लढत होत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी : वनिता गुळवे
करमाळा तालुका विकास आघाडी : योगिनी राजेभोसले

कोर्टी गणात आठ उमेदवार रिंगणात आहे.
भाजप (बागल) : नाना झाकणे
करमाळा तालुका विकास आघाडी (पाटील गट) : संजयकुमार जाधव
शिवसेना (उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे) : नानासाहेब साखरे
शरद पवार यांची राष्ट्रवादी : अमोल दुरंदे
राष्ट्रीय समाज पक्ष : मोहंमद जमीर शेख
वंचित बहुजन आघाडी : रमेश चव्हाण
अपक्ष : स्वप्नील जाधव
अपक्ष : संभाजी शिंदे

केत्तूर गणात चौरंगी लढत होत आहे.
अजित पवार यांची राष्ट्रवादी (शिंदे गट) : ऍड. अजित विघ्ने
करमाळा तालुका विकास आघाडी (पाटील गट) : विलास कोकणे
शिवसेना (उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे) : संतोष वारगड
राष्ट्रीय समाज पक्ष : मोहंमद शेख

चिखलठाण गटात पाच उमेदवार रिंगणात आहेत.
अजित पवार यांची राष्ट्रवादी : प्रशांत पाटील
काँग्रेस : अशोक वाघमोडे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना : अजिंक्य सरडे
करमाळा तालुका विकास आघाडी : प्रमोद बदे
अपक्ष : उत्तरेश्वर कांबळे

चिलखलठाण गणात दुरंगी लढत होत आहे.
अजित पवार यांची राष्ट्रवादी (शिंदे गट) : वनमाला सरडे
करमाळा तालुका विकास आघाडी (पाटील गट) : लताबाई गव्हाणे

उमरड गणात दुरंगी लढत होत आहे.
अजित पवार यांची राष्ट्रवादी (शिंदे गट) : सोनाली देवकर
करमाळा तालुका विकास आघाडी (पाटील गट) : अदिती पाटील

वांगी गटात दुरंगी लढत होत आहे.
अजित पवार यांची राष्ट्रवादी : मीनाक्षी देशमुख
करमाळा तालुका विकास आघाडी : रुपाली गोडसे

जेऊर गणात दुरंगी लढत होत आहे.
अजित पवार यांची राष्ट्रवादी (शिंदे गट) : उर्मिला लबडे
करमाळा तालुका विकास आघाडी (पाटील गट) : ललिता शिरस्कर

वांगी गणात तिरंगी लढत होत आहे.
भाजप (बागल गट) : सोनाली तकिक
करमाळा तालुका विकास आघाडी (पाटील गट) : द्वारका रणसिंग
वंचित बहुजन आघाडी : नागर कांबळे

केम गटात तिरंगी लढत होत आहे.
भाजप : मालती देवकर
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना : साधना पवार
करमाळा तालुका विकास आघाडी : कल्याणी तळेकर

साडे गणात चौरंगी लढत होत आहे.
अजित पवार यांची राष्ट्रवादी (शिंदे गट) : दशरथ घाडगे
करमाळा तालुका विकास आघाडी (पाटील गट) : नितीन सपकाळ
शिवसेना (उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे) : धंनजय पाटील
काँग्रेस : देवराव सुकळे

केम गणात चौरंगी लढत होत आहे.
भाजप : महावीर तळेकर
करमाळा तालुका विकास आघाडी (पाटील गट) : ज्ञानेश्वर बिचितकर
शरद पवार यांची राष्ट्रवादी : अमरजित साळुंखे
अपक्ष : अशोक वाघमोडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *