अमिताभ बच्चन व रजनीकांत या दोघांनीही त्यांच्या सिनेसृष्टीतील प्रवासात एकापेक्षा एक सिनेमे दिले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार ते दोघेही पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहेत. 32 वर्षांनी स्क्रिन शेअर करताना ते दिसणार आहेत. ‘जेलर’ आणि ‘लाल सलाम’ या सिनेमाच्या शूटिंगनंतर रजनीकांत टीजे ग्रानवेल दिग्दर्शित ‘जय भीम’ या सिनेमाचं शूटिंग पूर्ण करणार आहेत.
‘थलाइवर 170’ हा रजनीकांतचा 170 वा सिनेमा आहे. त्यामुळे सिनेमाचं नाव ‘थलाइवर 170’ ठेवण्यात आलं आहे. ‘थलाइवर 170’ या सिनेमात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अमिताभ बच्चन आधी ‘पोन्नियिन सेल्वन’ या सिनेमातील चियान विक्रम यांना या सिनेमासाठी विचारणा झाली होती. पण आता या सिनेमात अमिताभ बच्चन आणि रजनीकांत दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे.