करमाळा (सोलापूर) : यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त व्याख्यान झाले. महाविद्यालयाच्या विजयश्री सभागृहामध्ये प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. प्रा. पृथ्वीराज इंगळे व प्रा. धीरज पाचपिले यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
प्रा. इंगळे म्हणाले, ‘अण्णाभाऊंच्या साहित्यावर साम्यवादाचा प्रभाव दिसतो आणि त्यातूनच त्यांचे साहित्य श्रमिक, कष्टकरी आणि दलितांसाठी निर्माण झाले असल्याचे दिसून येते.’ प्रा. पाचपिले म्हणाले, ‘लोकमान्य टिळक हे भारतीय असंतोषाचे जनक होते. त्यांनी अनेक संस्था स्थापन केल्या’. आगरकर आणि टिळक यांच्या राजकीय मतभेदाविषयी प्रा. पाचपिले यांनी सविस्तर मांडणी केली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील, उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे, संभाजी कीर्दाक आदी यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. डॉ. वंदना भाग्यवंत यांनी तर प्रास्ताविक प्रा. रुपाली थोरात यांनी केले. आभार प्रा. दीपक सोनवणे यांनी मानले.