Women Festival on International Women Day in Jeure

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील जेऊर येथे ८ ते १४ मार्च दरम्यान जागतिक महिला दिनानिमित्त ‘महिला महोत्सव’ होणार आहे. माजी आमदार नारायण आबा पाटील मित्र मंडळ व ग्रामपंचायतच्या वतीने हा महोत्सव होत आहे. यामध्ये महिलांसाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. यामध्ये जेऊरसह परिसरातील महिलांसाठी भरगच्य कार्यक्रमांची पर्वणी असणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन ज्योतीताई पाटील यांच्या हस्ते झाले.

यावेळी जयश्री दळवी, मंगल गादीया, ताहिरा शेख, नंदाताई गादीया, कल्पना पाबळे, जनाबाई कांबळे, रत्नमाला बादल, भाग्यश्री वाघमोडे, अजिता पाटील, ग्रामपंचायत सदस्या समीरा दोशी, यास्मीन शेख, अनिता जगताप, उषा गरड, उज्वला कुलकर्णी, साधना लुणावत, सुनिता पाटील, रेणुका दोशी, उषा सरक, अंकिता वेदपाठक, सुनिता वाघमारे, दिपा दोशी, गयाबाई बदे, शीतल पाटील, अलका व्यवहारे, रागीनी ठाकर, राणी सरडे, मंगल जगताप, मनीषा वनवे, मीनाक्षी सरक, भाग्यश्री वाघमोडे, भारती बलदोटा, अश्विनी देशपांडे, मनीषा लोंढे, संजीवनी महामुनी, सुवर्णा सानप, प्रफुल्लता देशपांडे, संगीता तळेकर, माया सपकाळ आदी उपस्थित होत्या.

स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. रोहिणी सुतार व अपर्णा पाथ्रुडकर यांनी हे गीत सादर केले. समीक्षा कुलकर्णी यांनी आभार मानले. या महोत्सवात रांगोळी, उखाणे, फनी गेम्स, अंताक्षरी, फनी गेम्स, वेशभूषा, अभिनय, फनी गेम्स, वक्तृत्व, पाककला, फनी गेम्स, नृत्य अशा स्पर्धा होणार आहेत.

प्रत्येक महिला ही कलागुणांनी संपन्न असतेच. त्यांना आपल्या कलागुणांच्या माध्यमातून व्यक्त होण्यासाठी फक्त एक सुसंस्कृत व हक्काचे व्यासपीठ  हवे असते. आणि हा उद्देश ठेवून माजी आमदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा मंच उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न गेली २१ वर्षे अखंडितपणे करत आहोत. आणि यापुढेही करत राहू.

  • ज्योतीताई पाटील

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *