करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील रावगाव येथील शेळके वस्ती (छत्रपती नगर) येथे तब्बल 18 वर्षांनी बंद असलेला अखंड हरिनाम सप्ताह सुरु झाला आहे. हभप वै. भागवत महाराज खंडागळे (मात्रेवाडी) यांच्या कृपाशीर्वादाने व हभप दीपक महाराज परदेशी (कोरेगाव) यांच्या पुढाकाराने हा सप्ताह सुरु केले जात आहे. संपूर्ण गावकऱ्यांच्या त्याच उत्साहात पुन्हा एकदा नव्याने सुरू झाला.
छत्रपती नगर येथील अखंड हरिनाम सप्ताहनिमित्त रोज सकाळी पहाटे काकडा भजनत त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण होते. या ज्ञानेश्वरी पारायणासाठी गावातील तरुण मंडळी उत्साहाने सहभागी झाली होती. नंतर नाश्ता व संध्याकाळी हरिपाठ व हरिकीर्तन होते. त्यानंतर प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या पदार्थाचा महाप्रसाद व नंतर संध्याकाळी हरिजागर हे दैनंदिन कार्यक्रम उत्साहात पार पडले.
या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सर्व तरुण मंडळींनी एकत्र येऊन रक्तदानाचा उपक्रम घेण्याचे ठरविले व तो यशस्वीरित्या पार पडला. या रक्तदानाचे उद्घाटन हभप दीपक महाराज परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले. या रक्तदानामध्ये पंचक्रोशीतील व छत्रपती नगर येथील ५१ तरुणांनी रक्तदान केले. प्रत्येक रक्तदात्यास एक पाण्याचा जीआर भेट म्हणून देण्यात आला. हा अंखड हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रम अखंड अविरतपणे सुरू राहावा, अशी इच्छा पंचक्रोशीतील भक्तांनी प्रत्येक दिवशी झालेल्या कीर्तनकारांनी व्यक्त केली. या अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात सकाळी प्रभात फेरी काढून करण्यात आली व शेवटी ही प्रभात फेरी काढून शेवट करण्यात आला.