सोलापूर : सार्वजनिक कार्य, उत्सव, गणोशोत्सव व इतर जयंती आणि उत्सव साजरे करण्यासाठी या कार्यालयात नोंदणीकृत नसलेले मंडळ, संस्था, उत्सव, कमिट्या, जनतेकडून देणगी, वर्गणी रूपाने गोळा करीत असतात, सार्वजनिक कार्य, उत्सव करणाऱ्या या संस्था, मंडळे, उत्सव, समित्या यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, 1950 च्या कलम 41 क अन्वये धर्मादाय उप आयुक्त कार्यालय, सोलापूर विभाग सोलापूर यांचे कार्यालयात ऑनलाईन पध्दतीने विहित नमुन्यात कळविणे बंधनकारक आहे.

याप्रमाणे संबंधितांना ऑनलाईनपध्दतीने तात्पुरती परवानगी मिळू शकेल. आवश्यक तात्पुरती परवानगी न घेतल्यास गुन्हा ठरतो. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे परिपत्रक क्र 466 नुसार ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया https://charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अर्ज भरण्याची माहिती संकेत स्थळावरीलप्रणाली मार्गदर्शक या टॅबच्या अंतर्गत 41 (क) परवानगी मध्ये सविस्तर उपलब्ध आहे. अर्ज भरण्यासाठी पुढील प्रमाणे कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करणे आवश्यक राहतील.1. अध्यक्ष व सचिव यांचे पॅनकार्ड तसेच ओळखपत्रे (आधारकार्ड/निवडणूक कार्ड/ वाहन चालक परवाना), 2. मागील वर्षाचे हिशोब (उत्सवाचा खर्च रू.5 हजार पेक्षा जास्त असल्यास सनदी लेखापालाकडून तयार करून घ्यावेत.), 3. या कार्यालयामार्फत मागील वर्षी देण्यात आलेल्या तात्पुरती परवानगीची प्रत, 4. या वर्षापासून नव्याने कार्य उत्सव साजरे करीत असल्यास नगरपालिका हद्दीतील मंडळांनी त्यांचे भागातील नगरसेवकाचे (प्रथम वर्ष उत्सव साजरा करीत असले बाबतचे) शिफारसपत्र व ग्रामीण भागातील असल्यास संबंधित ग्रामपंचायतीचे वरील आशयाचे शिफारसपत्र आवश्यक आहे याची नोंद घ्यावी.

अत्यंत महत्वाची सुचना, महाराष्ट्र विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 च्या कलम 41 क अन्वये असणारी चौकशी न्यायिक स्वरूपाची असल्यामुळे अर्ज योग्य रितीने सादर करणे ही अर्जदाराची जबाबदारी राहील, न्यायिक चौकशी मधील मा.धर्मादाय उप आयुक्त कार्यालय, सोलापूर विभाग सोलापूर यांचे आदेश पारित झाले नंतरच तात्पुरती परवानगी देण्यात येते. सबब संबंधितांना लवकरात लवकर अर्ज दाखल करावेत. वर नमूद कलमाखाली तात्पुरती परवानगीचे अर्ज कार्यालयात प्रत्यक्ष स्वीकारले जाणार नाहीत, असे धर्मादाय उप आयुक्त प्रवीण कुंभोजकर यांनी कळविले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *