Apply for 15 days Poultry Training on behalf of Animal Husbandry DepartmentApply for 15 days Poultry Training on behalf of Animal Husbandry Department

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्व पशुपालक, शेतकरी व सुशिक्षित बेरोजगारांना कळविण्यात येते की पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद सोलापूरच्या वतीने सधन कुक्कुट विकास गट नेहरूनगर, सोलापूर येथे 15 दिवसाचे कुक्कुट पालन प्रशिक्षण आयोजित केले आहे. 28 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर 2023 पर्यंत प्रशिक्षण कालावधी आहे. तरी प्रवेश घेऊ इच्छीत असणाऱ्यांनी 20 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज स्विकारले जातील. तरी इच्छुकानी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात येत आहे.

सदर प्रशिक्षणासाठी शैक्षणिक पात्रता किमान 7 वी पास असणे अपेक्षित आहे. तसेच सदर प्रशिक्षण सुशिक्षित बेरोजगारांना सुवर्ण संधी आहे. सदर प्रशिक्षणासाठी प्रवेश फी सर्व प्रवर्गासाठी 100 रूपये आकारण्यात येईल सोबत शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, आधार कार्ड, फोटो जोडणे आवश्यक आहे. असे आवाहन डॉ. एन. एल. नरळे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर यांनी केले आहे. सदर प्रशिक्षणासाठी संपर्क डॉ. एस. एम. बोधनकर, पशुधन विकास अधिकारी, सधन कुक्कुट विकास गट, नेहरु नगर, बी. पी. एङ कॉलेज जवळ, सोलापूर.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *