आमदार पाटील यांच्या हस्ते घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्र

करमाळा (सोलापूर) : सरकारच्या सूचनेनुसार करमाळा पंचायत समितीच्या सभागृहात घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्र व प्रथम हप्ता वितरण झाले. आमदार नारायण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमा पूजन पंचायत समितीचे माजी सदस्य हमाल पंचायतचे अध्यक्ष ॲड. राहुल सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम, बाल विकास अधिकारी किरण सुर्यवंशी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *