करमाळा (सोलापूर) : उमरडमध्ये श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न मिरजगाव येथील सद्गुरु कृषी महाविद्यालयाच्या कृषीदुतांचे आगमन झाले आहे. ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले.
ग्रामीण कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषीदुत विविध विषयावर मार्गदर्शन, कृषीक्षेत्रातील अद्यावत तंत्रज्ञानविषयक, शेतकरी गटशेती, शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन याविषयी ते मार्गदर्शन व कृषि योजनाबद्दल माहिती देणार आहेत. कृषीदूत विशाल शेटे, केशव पवार, वैभव झांबरे, विराज वाबळे, गौरव पुराणे, प्रतिक वाघुले हे विद्यार्थी यामध्ये सहभागी आहेत.
उमरडमध्ये तीन महिने राहून विद्यार्थी विविध शेतीविषयक प्रात्यक्षिके व उपक्रम राबवणार आहेत. याप्रसंगी कृषीदुतानी उपस्थित ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना उपक्रमाचा उद्देश व रूपरेषा समजावून सांगितली. उमरडच्या सरपंचांनी गावची माहिती दिली व विद्यार्थ्याना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. ग्रामसेवकांनी ग्रामस्थांना विद्यार्थ्याच्या उपक्रमाला आवश्यक ते सहकार्य प्रशासनाकडून केले जाईल, असे आश्वासन दिले.
उमरडचे सरपंच लालासाहेब पडवळे, उपसरपंच मुकेश बदे, ग्रामसेवक अनिल भालेराव, कर्मचारी फत्तेखान सय्यद, अमोल मोहिते, पोलिस पाटील अंकुश कोठावळे, संपत कोठावळे, दीपक सोनवणे, गणेश पठाडे, यशराजे पाटील, गणेश चौधरी आदी यावेळी उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक डॉ. शंकरराव नेवसे, अध्यक्षा कल्याणी नेवसे, सचिव राजेंद्र गोरे, प्रशासन अधिकारी सखाराम राजळे, समन्वयक प्रा. सुरज जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामदास बिटे, कार्यक्रम अधिकारी प्रा. शिवम यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदूत काम करणार आहेत.