करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील वांगी नं. ३ येथील वैष्णवी बेंद्रे या नेट परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून घेण्यात आलेल्या नेट परीक्षेत विद्यार्थीनी बेंद्रे यांना ३०० पैकी १८८ गुण मिळाले आहेत. ‘मराठी साहित्य’ या विषयात Assistant Professor आणि Junior Research Fellowship साठी त्यांची निवड झाली आहे. देशातील पहिल्या २० विद्यार्थ्यांच्या यादीत त्यांचे नाव आहे. पहिल्याच प्रयत्नात त्यांना हे यश मिळाले असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. डॉ. विक्रम बेंद्रे यांच्या त्या कन्या आहेत.

