करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यात पाऊस लांबला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. यातच पोथरे येथील शहाजी झिंजाडे ये शेतकऱ्याने लिंबोणीची बागेतील झाडे उपटून पेटवून दिली आहेत. लांबलेला पाऊस आणि कमी झालेले पाणी पातळी यामुळे लिंबू बाग सांभाळणे कठीण झाले आहे, त्यामुळे हा मार्ग स्वीकारला असल्याचे ते सांगत आहेत.
झिंजाडे यांच्याकडे दोन एकर लिंबोणीची बाग होती. त्यांच्याकडे दोन बोअर, कान्होळा नदीवरून पाईपलाईन व विहिरी आहे. मात्र त्याला पाणीच नाही. २०१२ मध्ये त्यांनी ही बाग केली होती. मात्र नेमकी फळाला लागताच पाणी कमी पडले. त्यामुळे त्यानी झाडे तोडून पेटून दिली आहेत. त्यांना आधी टॅंकरने पाणी घातले होते, मात्र आता टॅंकरने पाणी घातले. मात्र आता परस्थिती राहिली नाही. त्यामुळे हा निणर्य घेतला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. लिंबोणीला आतापर्यत कधीही नुकसान भरपाईची मदत मिळाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.