करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील शेलगाव येथे जल जीवन मिशन योजनेच्या कामाचे सरपंच अशोक काटोळे यांच्या हस्ते भूमीपूजन झाले आहे. नवीन विहीर खोदकाम, पिण्याच्या पाण्याची टाकी बांधणे व वाडीवस्तीसह गावठाणला पाणीपुरवठा करणे ही येथे योजनेअंतर्गत मंजूर आहेत. त्यासाठी 71 लाख निधी मंजूर आहे. भूमिपूजनावेळी उपसरपंच सचिन वीर, विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे माजी चेअरमन सुभाष पायघन, नवनाथ जगताप, भरत वीर, शंकर शिंदे, गणेश जाधव, धर्मराज शिंदे, राहुल कुकडे, सचिन जगताप, आजिनाथ वीर, पांडुरंग कातुरे, राजाराम वीर, आत्माराम वीर, महादेव वीर, आबा दास, संजय वीर, बापू माने, तानाजी वीर, डॉ. विकास वीर, माऊली शिंदे, केशव दास, मयूर वीर, प्रशांत वीर, प्रभाकर वीर, अमोल शिंदे, अंकुश शिंदे, अण्णा शिंदे, सुनील माने, नितीन जगताप, विशाल कातुरे, विठ्ठल शिंदे, दादा शिंदे, निखिल वीर, विशाल वीर आदी उपस्थित होते.


