पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

Assembly election schedule announced in five states

देशातील राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज (सोमवारी) निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. निवडणूक आयुक्त राजीव कुमार हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकांची सेमीफायनल म्हणून या निवडणुकीकडे पाहीले जात आहे.

तेलंगणा, राजस्थान, मध्यप्रदेश व मिझोराममध्ये एकाच टप्प्यात तर छत्तीसगडमध्ये (नक्षलग्रस्त राज्यात) दोन टप्प्यात निवडणुका होणार आहे. मिझोराममध्ये 7 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे, तर तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. याशिवाय 17 नोव्हेंबरला मध्यप्रदेशात आणि 23 नोव्हेंबरला राजस्थानमध्ये मतदान होणार आहे. छत्तीसगडमध्ये 7 आणि 17 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या पाच राज्यांमध्ये वेगवेगळ्या तारखांना मतदान होणार आहे, मात्र निवडणुकीचे निकाल 3 डिसेंबरला एकत्र येतील.

राजस्थान व छत्तीसगडमध्ये सध्या काँग्रेसचे सरकार आहे. तर मध्यप्रदेशात भाजपचे सरकार आहे. तेलंगणात बीआरएसचे सरकार असून मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंटचे सरकार आहे. निवडणूक आयुक्त कुमार म्हणाले, निवडणूक आयोगाच्या पथकाने निवडणूक जाहीर झालेल्या पाचही राज्यांचा दौरा करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आहे. दौऱ्यादरम्यान सुरक्षेबाबतही संपूर्ण तयारी करण्यात आली आहे.

निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले की, पाच राज्यातील 16.1 कोटी मतदारांपैकी 60.02 लाख नवीन मतदार आहेत. 8.2 कोटी पुरुष व 7.8 कोटी महिला येथे मतदार आहेत. 17 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत निवडणूक आयोगाला मतदार कार्डमध्ये कोणताही बदल करता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *