निंभोरे येथे कोब्रा नागाला सर्पमित्राकडून जीवदान

At Nibhore a cobra was given life by a snake charmer

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील निंभोरे येथे एका कोब्रा नागाला सर्पमित्राने जीवदान दिले आहे. रवींद्र वळेकर यांच्या शेतात आज (बुधवारी) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास कोब्रा नाग दिसून आला. त्यानंतर त्यांनी सर्पमित्र अतुल ढावरे (रा. केम) यांना याची माहिती दिली. त्यांनी त्याला कौशल्य दाखवत पकडले. आणि निसर्गाच्या सानिध्यात सोडून देऊन जीवदान दिले आहे. दरम्यान शेतकरी बांधवांना सर्प दिसल्यास त्याला न मारता सर्पमित्र यांचेशी संपर्क (7387814784) साधावा. निभोरे येथे नागाला पकडण्यासाठी मधुकर अवघडे, राज पठाण, लक्ष्मण वळेकर, दत्ता वळेकर, सुजित काळदाते, पिनु वळेकर, भैरु सांगडे, सोनू गुरव, दादा गुरव, पवि वळेकर, नाथा शिंदे, ईश्वर मस्के आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *