करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरात आज (शनिवार) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) पश्चिम महाराष्ट्र संघटक नागेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ‘ऍट्रॉसिटी बचाव आंदोलन’ होणार आहे. अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार दाखल गुन्हात कडक कारवाई व्हावी या मागणीसाठी हालगी नाद आंदोलन केले जाणार आहे. यावेळी दीपक केदार व वैभव गीते हे मार्गदर्शन करणार आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गायकवाड चौक परिसरात लावलेले बॅनर सर्वांचे लक्ष वेधत आहेत. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
करमाळ्यात आज ‘ऍट्रॉसिटी बचाव आंदोलन’
