करमाळा (सोलापूर) : करमाळ्यात रविवारी (ता. 26) संविधान दिनी संविधान बचाव मोर्चा निघणार आहे. नागेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार असून या मोर्चाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. सर्व भारतीयांना हक्क व अधिकार देणारे अन समता, बंधूता, एकात्मता, जोपासणारे संविधान यांना नको आहे ते वाचवणे सर्वांची जबाबदारी आहे म्हणून संविधान बचाव मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे कांबळे यांनी सांगितले. या मोर्चाच्या निमित्ताने संपूर्ण तालूक्यात संविधान जनजागृती बैठका आयोजित करण्यात आल्या व त्यास उदंड प्रतिसाद मिळत आहे. संविधानासाठी लोक स्वतःहून पूढे येत आहेत. रविवारी 26 नोव्हेंबरला डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पूतळा करमाळा येथून सूरू होणाऱ्या या मोर्चास हजारो लोक उपस्थित राहतील, असा अंदाज आहे.
करमाळ्यात रविवारी ‘संविधान बचाव मोर्चा’
